तुळजापुर : कुमार नाईकवाडी

 येथील शुक्रवार पेठ खडकाळ गल्लीतील नरसिंह गणेश मंडळाच्या वतीने नरसिंह जयंतीचे औच्युत साधुन दि.६ बुधवार रोजी नरसिंह जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली.

 या वर्षी कोरोना वायरस च्या पार्श्वभूमीवर नरसिंह जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. बुधवारी प्रारंभी सकाळी नरसिंह देवतास श्रीखंडाचा महाअभिषेक घालून वस्ञोअलंकार पुजा करुन शिर्याचा महानैवद दाखवुन महाआरती करण्यात आली.प्रत्येक वर्षी या नरसिंह गणेश मंडळाच्या वतीने मोठे अन्नदान करण्यात येते. माञ या वर्षी प्रथमच नरसिंह जयंतीवर कोरोना वायरस चे सावट असल्यामुळे या वर्षी मंडळाच्या वतीने ५० किलो शिरा करुन शहरातील नरसिंह भक्त मंडळीना घरपोच शिर्या पाँकेट देवुन भक्तीभावाने नरसिंह जयंती साजरी करण्यात आली. तसेच शहरातील इतर भागात ही असलेल्या नरसिंह मंदीरात दुग्धा अभिषेक करवून खिरीचा नैवद दाखवून साध्या पद्धतीने नरसिंह जयंती साजरी करण्यात आली.


 
Top