तुळजापूर, दि. ०६ :

 कै. हरिश्चंद्र ( नाना ) कोंडीबा हंगरगेकर यांच्या स्मरणार्थ येथील माजी नगरसेवक अमर (दाजी) हंगरगेकर यांनी गेल्या 35 दिवसापासून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून गरजू गोरगरिबांसाठी आणि कर्तव्यदक्ष असणाऱ्या पोलीस, नगरपरिषद, वैद्यकीय, एसटी महामंडळ, वीज महावितरण, आणि मंदिर संस्थांच्या कर्मचाऱ्यांसाठी सुरू असणाऱ्या अन्नदान उपक्रमास पुलाव राईस व बुंदीचे लाडू दिले तसेच मुस्लीम बांधवांसाठी घरपोच दिल्या जाणाऱ्या इफ्तार पार्टीसाठी 100 किलो चिकन दिले. 

 माजी नगरसेवक अमर (दाजी) हंगरगेकर यांनी केलेल्या मदतीचे शहरातुन कौतुक केले जात आहे आमदार राणाजगजितसिंह पाटील व मुख्याधिकारी आशिष लोकरे यांनी या उपक्रमास सदिच्छा भेट देऊन गरजूंना जेवण वाटप करून सेवाकार्य केले यावेळी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, युवा नेते विनोद (पिटु भैय्या) गंगणे,  गटनेते संतोष परमेश्वर, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब शिंदे, नगरसेवक अभिजित कदम, आनंद कंदले आदींची उपस्थिती होती
 
Top