तुळजापूर, दि. ०८ : कुमार नाईकवाडी
सध्या केंद्र केंद्र सरकार व राज्य शासनाने काळामध्ये दुकाने चालू ठेवण्यास व जिल्हा अंतर्गत व्यवहार सुरळीत करणे याबाबत आदेशात केले आहेत. पण उस्मानाबाद जिल्ह्यात जिल्हा प्रशासन यांचा मनमानी कारभाराबद्दल जिल्हा भाजप मीडिया विभाग वतीने दि.८ शुक्रवार रोजी माननीय श्री.उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांना तुळजापूर तहसीलदार सौदागर तांदळे यांच्याद्वारे एक लेखी निवेदन दिले आहे.
या निवेदनात धाराशिव जिल्हा सध्या ग्रीन झोन मध्ये असताना जिल्हा उस्मानाबाद यांनी जिल्ह्यामध्ये फक्त आठवड्यातून तीन दिवस म्हणजे सोमवार बुधवार आणि शुक्रवार या दिवशी दुकाने सुरू ठेवण्यास आदेशित केले आहे आठवड्यातून तीन दिवस दुकाने चालू होत असल्याने शहरांमध्ये ग्राहकांनी जीवन उपयोगी वस्तू घेण्यास गर्दी करत आहेत त्यामुळे सोशल डिस्टनसी पाळले जात नाही. तरी धाराशिव जिल्ह्यामध्ये शासनाच्या नियमाप्रमाणे दररोज दुकाने चालू ठेवण्यास संबंधित जिल्हा प्रशासनाने तात्काळ शासनाच्या नियमाचे पालन करावे असे निवेदनात नमूद केले आहे. या निवेदनावर भाजप जिल्हा मीडिया उपाध्यक्ष संजय खुरुद, तालुकाध्यक्ष सचिन ताकमोघे, शहराध्यक्ष सागर कदम, तालुका सरचिटणीस विकास मलबा, सोशल मीडिया तालुका अध्यक्ष सागर पारडे यांच्या स्वाक्षर्या आहेत.

