मुरूम, दि. २५ : मुस्लीम बांधवांचा पवित्र दिन रमजान. या ईद निमीत्त सोमवारी (ता.२५) रोजी सकाळी घरातच राहून मुस्लीम बांधवांनी साध्या पद्धतीने नमाज पठण केले. या प्रसंगी शबीर मुल्ला, शारुक जेवळे, मशाक मुजावर, राजु मुल्ला, अब्दुल मुल्ला, अफताब मुल्ला आदी लहान चिमुकल्यांसह युवकांनी या कोरोना संकटातून संपूर्ण देशातील जनतेचे रक्षण करावे, या कोरोना बाधित रुग्णांची लवकरच सुटका व्हावी, कोरोनावर लवकर लस शोधली जावी व पुन्हा आपला देश सुजलाम्-सुफलाम् व्हावा अशी प्रार्थना या चिमुल्यांसह युवकांनी नमाज पठण करताना अल्लाहकडे केली. मुस्लीम समाजात पवित्र समजल्या जाणाऱ्या रमजान महिन्याची सुरूवातच मुळात कोरोनाच्या संचारबंदीत झाली. यामुळे सुरुवातीपासून मुस्लीम बांधवांना मस्जीदमध्ये नमाज पठनासाठी जाता आले नाही. आजपर्यंत अशी कधी वेळच आलेली नाही म्हणून घरातच राहून नमाज पठण करण्यास सुरुवात केली होती. चौथ्या टप्यातही कोरोनाचा प्रादूर्भाव कमी होत नसल्यामुळे रमजान ईदची नमाज ही घरातच करावी असे आवाहन ही प्रशासनाकडून करण्यात आले होते. या आदेशाचे पालन करत मुस्लीम बांधवांनी शारीरिक अंतर ठेवत घरीच रमजानची नमाज पठण केली व मौलाना अब्बास, मौलाना शौकत नदाफ, मौलाना अयुब साहब शिरूरे, मौलाना खालीद डबीर यांच्यासह सर्व मुस्लीम बांधवांनी कोरोनाच्या संकटातून जनतेचे रक्षण व्हावी अशी प्रार्थना अल्लाकडे केली. सलीम अत्तार, आयुब मासुलदार, रशिद शेख, रफिक येणेगूरे, हुसेन साहब चौधरी, सय्यद इनामदार, अयुब पटेल, जाकीर बागवान, रफिक पटेल, जाकीर बागवान, शफी इमडे, हुसेन नुरसे आदींनी पुढाकार घेवून शहरात साध्या पध्दतीने रमजान दिन साजरा करण्याचे आवाहन ही मुस्लीम बांधवांना अगोदरच करण्यात आले होते.
रमजान दिनाच्या मुस्लीम बांधवांना माजी मंत्री तथा महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा नगर शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष बापूराव पाटील, जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते शरणजी पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती अॅड. राजासाहेब पाटील, नगराध्यक्षा अनिता अंबर
सपोनि यशवंत बारवकर, प्राचार्य डॉ. अशोक सपाटे, महात्मा बसवेश्वर पतसंस्थेचे चेअरमन शिवशरण वरनाळे, व्यापारी नागरी बँकेचे सचिव राजू मिणीयार, रोटरीचे माजी अध्यक्ष डॉ.नितीन डागा, माजी प्राचार्य दत्तात्र्य इंगळे, प्रजापित्ता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाचे प्रमुख राजूभाई भालकाटे, संत निरकारी मंडळाचे मुखी दयानंद साखरे, माजी सैनिक संघटनेचे बब्रुवान जाधव, विजयकुमार हिरेमठ, उपनगराध्यक्ष श्रीकांत बेंडकाळे, नगरसेवक सहदेव गायकवाड, सिध्दू स्वामी, महावीर नारायणकर, मनोहर शिंदे, किरण गायकवाड, आनंद कांबळे, मोहन जाधव, बबनराव बनसोडे, आदींनी शुभेच्छा दिल्या.
