तुळजापूर, दि. 25 :

महाराष्ट्र राज्यातील माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रश्नासाठी राज्य सरकारने आश्वासन देऊन दूर्लक्ष केल्याच्या मुळे 26 मे रोजी महाराष्ट्र राज्यातील  कनिष्ठ महाविद्यालयीन महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघाच्या वतीने सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आत्मक्लेश आंदोलन करणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष प्रा रमेश नन्नवरे यांनी दिली आहे

शिक्षकांच्या अनेक प्रश्नासाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ राज्य सरकार बरोबर अनेक बैठका आणि चर्चा केल्यानंतर लक्षवेधी आंदोलन म्हणून 26 मे रोजी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत घरांमध्ये बसून त्मक्‍लेश आंदोलन करण्यात येणार आहे उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक यामध्ये सहभागी होत आहेत

राज्य शासनाने मूल्यांकन केलेल्या शिक्षकांचे तातडीने वेतन अदा करावे, 2003-2004 पासून 2017 - 18 दरम्यानच्या पदांना मंजुरी देऊन त्यांनाही वेतन सुरु करावे, माहिती तंत्रज्ञान शिक्षकांना अनुदान देण्यात यावे, 2012 नंतर मान्यता दिलेल्या पदांना वेतन लागू करावे, अकरावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना बारावीत प्रवेश देण्याच्या संदर्भात तातडीने निर्णय घ्यावा, कोरोना आपत्तीच्या काळात शिक्षकांना दारूची दुकाने चेक पोस्ट सर्वेक्षण तसेच विलगीकरण अशी कामे न देता त्यांची पद पद आणि प्रतिष्ठा लक्षात घेऊन जनजागृती करणे नोंदी घेणे यासारख्या काम देण्यात यावे तसेच अत्यावश्यक सेवेमध्ये काम केल्याबद्दल अशा शिक्षकांना 50 लाख रुपये विमा योजना लागू करावी अशा मागण्या महासंघाने या आत्मक्लेश आंदोलनाच्या दरम्यान जाहीर केले आहेत सरकारने या मागण्यांचा गांभीर्याने विचार करण्याची मागणी जिल्हाध्यक्ष प्रा. रमेश नन्नवरे व सचिव प्रा. प्रशांत भागवत यांनी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी डॉ. दीपा मुधोळ यांना ऑनलाईन दिलेल्या निवेदनामध्ये केल्या आहेत.
 
Top