हंजगी, दि -25 :
अक्कलकोट तालुक्यातील आहेरवाडी येथील हुजुरबेग शेख यांच्या वस्तीवर आपल्या कुटुंबिया समवेत घरातच रमजान ईदची नमाज पडण्यात आली. या वेळी हुजूरबेग यांनी रमजान ईद निमित्त कुटुंबीयांचे उद्बोधन केले. यावेळी त्यांची मुले व नातंवडे या ठिकाणी उपस्थित होते.
सर्व प्रथम त्यांनी रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.पुढे बोलताना हुजूरबेग शेख म्हणाले की, रमजान मध्ये तीस दिवसाच्या उपवासाने मानवाच्या अंतरमनामधील क्लेश, ईर्ष्या जळून समूळ नष्ट होतात. अणि मनामध्ये विवेक विचाराची पालवी फुटते आणि मनुष्य आनंद व्यक्त करू लागतो. आज आपल्या समोर जी भयानक परस्थिती कोरोना वायरसच्या रूपाने उभी आहे. या मध्ये आपण सर्वजण कारणीभूत आहोत. कळत नकळत अनेक अपराध, गुन्हे आपल्या हातून घडलेले असतात याची शिक्षा म्हणून आज आपल्या वर ही परिस्थिती ओढावली आहे. ईश्वर आपल्यावर नाराज झालेला आहे म्हणून ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी आपण नमाज व प्रार्थनेच्या रूपाने पुढे आले पाहिजे. कोणतीही स्वार्थ भावना मनामध्ये न ठेवता. स्वच्छ निखळ मनानी नमाज पडा आणि नमाज मध्ये या व्हायरस पासून मुक्ती मिळवण्यासाठी प्रार्थना करा. ईश्वर हा खूप दयाळू आहे. एक आई आपल्या मुलावर जेवढे प्रेम करते त्यापेक्षा सत्तरपटीने अधिक प्रेम तो आपल्यावर करतो. त्यामुळे तोच आपल्याला या व्हायरस पासून सावरेल. त्याच बरोबर कोणत्याही छोट्या -मोठ्या कारणास्तव वैरभाव, भांडण-तंटा, द्वेष या पासून नेहमी दूर रहा. पुढचा जरी तुमचा द्वेष करीत असेल तरी त्याला तुम्ही प्रेम द्या. हृदया मध्ये नेहमी विवेक विचाराना जागा दया. सद्विवेक बुद्धीने वाघा. नेहमी सत्याचा मार्ग अनुसरा. राक्षसी मनाला मूठ माती द्या. वाम मार्गापासून दोन पाऊल दूर रहा. संकट आणणारा ईश्वर आहे आणि संकटापासून बचाव करणारा ईश्वरच आहे. जीवन हे क्षणभंगुर आहे त्यासाठी एकमेकावर भरभरून प्रेम करा. कोणताही धर्म श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसून मानवता हाच धर्म सर्व श्रेष्ठ असल्याचे सांगितले.
