तुळजापूर : कुमार नाईकवाडी
- तुळजापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मधील आडत व्यापारी कर्मचारी संघटना व विजयकुमार गंगणे मिञमंडळा च्या वतीने दि.११ सोमवार रोजी शहरातील पाचशे गोरगरीबांना ऐक महिना पुरेल येवडा रेशन किट या वेळी सहकार आधिकारी प्रसाद कुलकर्णी आडत व्यापारी सभापती विजय गंगणे ,प्रियांका गंगणे व उस्मानाबाद पञकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत कदम,तुळजापुर तालुका पञकार संघाचे तालुकाअध्यक्ष प्रदीप अमृतराव पञकार ज्ञानेश्वर गवळी सचिन ताकमोघे आदीसह पञकार बांधवाच्या हस्ते सोशल डिस्टंन्स पाळत किट वितरीत करण्यात आले.
यावेळी संचालक बालाजी रोचकरी सचिव उमेश भोपळे माजी संचालक संतोष कदम आडत व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दत्ता मुळे अप्पा खोचरे कोंडीबा शेळके विजय गंगणे मिञ मंडळाचे मनोज गवळी भरत सोनवणे विवेक तांबे सह व्यापारी उपस्थितीत होते.
प्रादुर्भाव वाढल्यास तिसऱ्या टप्यात ही मदत करणार - सभापती विजय गंगणे
रेशन किट वाटप उपक्रमाचा दुसरा टप्पा असुन या उपक्रमास मंहत तुकोजीबुवा आडत व्यापारी यांनी मोलाची मदत केली असुन यापुढे कोरोना चा प्रादुर्भाव असाच राहील्यास तिसऱ्या टप्प्यात ही गोरगरीबांना वाटप करण्याचा विचार असल्याचे सभापती विजय गंगणे यांनी सांगितले