तुळजापूर : कुमार नाईकवाडी
वाढत्या प्रभावामुळे गोरगरीब जनतेचे हाल होत असून येथील नवनिर्मिती बहुउद्देशीय सामाजिक संस्थांच्या अध्यक्षा मीनाताई सोमाजी यांच्या वतीने तुळजापुर शहर व आजूबाजूच्या परिसरातील भटक्या विमुक्त जातींच्या व गोरगरीब लोकांना दिनांक 1 मे रोजी आठ दिवस पुरेल असे धान्याचे किट सुमारे दीडशे कीट व कापडी मास्क तसेच बिहार येथील कामानिमित्य अडकून पडलेले अशोक पंडित व त्यांचे कामगार यांना वाटप करण्यात आले.
यावेळी तहसील कार्यालयातील पुरवठा अधिकारी संदीप जाधव सहाय्यक पोलीस फौजदार रमाकांत शिंदे जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष श्रीकात कदम भाजप मीडिया सेलचे जिल्हा उपाध्यक्ष संजय खुरूद, भाजपा नेते नागेश नाईक,गुलचंद व्यवहारे,विजय वाघमारे, यमगरवाडी चे आश्रम शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल म्हात्रे सर, रमाकांत पवार सागर पारडे तसेच प्रेरणा बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष सौ.संध्या खुरुद, सौ अनिता चव्हाण सौ.मंदाकनी नाईकवाडी, तेजस सोमाजी उपस्थित होते.