तुळजापुर : कुमार नाईकवाडी
तुळजापूर येथील प्रभाग क्रमांक 8 मधील लोकप्रिय नगरसेवक नगरसेवक रणजीत इंगळे यांच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स चे पालन करून तुळजापुर शहरातील मुस्लीम बांधवाना घरपोच ईप्तार पार्टी चे आयोजन करण्यात आले.
यावेळी काँग्रेस चे युवा नेते सुनील चव्हाण, काँग्रेस जिल्हा अध्यक्ष धिरज पाटील, सज्जनराव साळुंखे, ऋषिकेश मगर, सुनील पिंटू रोचकरी, आनंद जगताप, श्रीकांत बापू धुमाळ, सर्व सन्माननीय सदस्य यांच्यासह कै विश्वास काका इंगळे विचार मंच तुळजापुर व जवाहर तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.


