तुळजापूर : कुमार नाईकवाडी
येथील शिवाजी चौक येथील राणी लक्ष्मीबाई उद्यानात असलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या आष्वारुढ पुतळ्यास दि.१४ गुरुवार रोजी तुळजापुर तालुक्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांच्या हस्ते दुग्ध अभिषेक घालून व पुजन करुन अभिवादन करण्यात आले.
त्याचबरोबर छञपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औच्युत साधुन तुळजापुर शहरातील
प्रभाग क्र 8 ( पुर्व मंगळवार पेठ) ,वासुदेव नगर, वडार गल्ली, जिजामाता नगर, या भागात पायनापल शिरा घरोघरी वाटप करण्यात आला.
यावेळी नगराध्यक्ष, युवा नेते विनोद पिटुभैय्या गंगणे, नगराध्यक्ष श्री सचिन भैय्या रोचकरी, नगरसेवक विजय आबा कंदले, नानासाहेब लोंढे,अभिजीत कदम,गणेश सर रोचकरी,प्रकाश मगर,रत्नदिप भोसले,भरत सोनवणे,सोनु भिंगारे,पवनराजे इंगळे, उस्मानाबादचे नगरसेवक अभय इंगळे, श्रीनाथ शिंदे,हणमंत पुजारी,महेश गुंड व आनंद दादा कंदले मित्र परिवार उपस्थित होते.


