उमरगा, दि. 21 :

उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा येथील एका महिलेचा रिपोर्ट कोरोना पाॅझिटीव्ह आला आहे. रुग्णावर सध्या उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्चिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी दिली. उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता 17 वर पोहचली असून यातील 4 जण बरे होऊन घरी परतले आहेत.

सदरील महिला ही मुंबईहून उमरगा शहरात आली होती. सदरील रुग्ण उमरगा शहरातील एस. टी. कॉलनी परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती आहे. दरम्यान हा  भाग आता प्रशासनाने सील केला आहे..
 
Top