तुळजापुर : कुमार नाईकवाडी

 येथील भवानी रोड वरील चँनेल गेट जवळील गुरुवारी साँटसर्किटमुळे जळालेल्या दोन दुकानाची तुळजापुर नगरीचे नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी दि.२२ शुक्रवार रोजी पाहणी केली.

शुक्रवार दि.२२ मे रोजी भवानी रोड वरील चँनल गेट जवळील असलेल्या दोन दुकानास साँटसर्किट मुळे आग लागुन दोन दुकानातील सामान जळुन खाक झाल्याची घटना घडली होती. यामध्ये मोबाईल स्पेअर पार्ट व खेळणी दुकानांना आग लागुन त्यातील सर्व साहित्य जळुन खाक झाले होती. सदरील दुकानाची नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी पाहणी  करुन सदरील दुकानांची नुकसान  भरपाईसाठी तहसिलदार यांच्याकडे निवेदन देण्यात आले.


 निवेदन देतेवेळी नगरीचे कर्तव्यदक्ष नगराध्यक्ष सचिन रोचकरी, नगरसेवक नानासाहेब लोंढे, अभिजित कदम, आनंद कंदले, सुरज जगताप,बालाजी गायकवाड,शुभम राऊत आदी उपस्थित होते.


 
Top