पोलीस ठाणे, आंबी : साकत, ता. परंडा येथील एका शेतात सामाईक बांधावरुन वाद निर्माण होत आहे. अशी माहिती मिळाल्याने पोलीस ठाणे आंबी येथील पोहेकॉ- गजानन मुळे यांनी त्या ठिकाणी जाउन वाद निराकरणाचा प्रयत्न केला. यावर गहिनीनाथ हुके, अंबऋषी हुके, बळीराम हुके तीघे रा. साकत हे  गजानन मुळे यांच्या अंगावर धाउन गेले तसेच त्यांना अरेरावीची, उद्दामपनाची भाषा वापरली. अशा प्रकारे त्यांनी पोलीसाने (लोकसेवकाने) त्याचे शासकीय कर्तव्य करु नये म्हणुन जाणीव पुर्वक अडथळा निर्माण केला. अशा मजकुराच्या गजानन मुळे यांनी सरकार तर्फे दिलेल्या फिर्यादीवरुन वरील तीघांविरुध्द गुन्हा दि. 10.05.2020 रोजी नोंदवण्यात आला आहे.
 
Top