नळदुर्ग, दि. १० : 

एकीकडे कोरोनाचे सावट आणि दुसरीकडे शनिवार रोजी दुपारी 2 च्या सुमारास 33/11 महावितरण येथील ट्रान्सफार्मर मध्ये बिघाड होऊन आग लागली होती अग्निशामक दलाच्या जवानांनी 1 तासात ही आग आटोक्यात आणली. लॉकडाउन मुळे नागरिक घरीच आहेत पुढील 1-2 दिवस लाईट येईल की नाही शहरातील नागरिकांमध्ये भीती होती. नळदुर्ग शहर व परिसरातील लोकांना वीजपुरवठा मुळे कोणत्याही त्रासाला सामोरे जाऊ न देता महावितरणच्या कर्मचाऱ्यांसमोर शहर व परिसरातील गावांना वीजपुरवठा सुरळीत करण्याचे मोठे आव्हान होते. या आव्हानाचा तत्परतेने सामना करत उपलब्ध उपकरणाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांनी काही तासांमध्ये वीजपुरवठा सुरळीत केल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. 

       कोरोना सोबतच आगीमुळे निर्माण झालेल्या अडचणीचा सामना करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आरंभ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने सोशल डिस्टन्सिंग चे पालन करीत सर्व कर्मचाऱ्यांवर फुलांची उधळण आणि टाळ्या वाजवून कौतुक व आभार व्यक्त करण्यात आले तसेच कर्मचाऱ्यांना संस्थेच्या वतीने मास्क, सॅनिटायझर आणि डेटॉल हॅन्डवॉश देऊन आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष राहुल हजारे, उपाध्यक्ष विशाल डुकरे, सचिव श्रमिक पोतदार, कोषाध्यक्ष सागर हजारे, पप्पू पाटील, सुजित सुरवसे, प्रसिद्धी प्रमुख आयुब शेख, मयूर महाबोले आदी उपस्थित होते.
 
Top