अणदुर, दि. ०६ :
पोलीस महासंचालक मानचिन्ह व पदक मिळाल्या बद्दल आणि उत्कृष्टपणे सेवा बजावल्याबद्दल नळदुर्ग पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक कैलास लहाने यांचा तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे मंगळवार दि. ५ मे रोजी घुगे परिवार च्या वतीने सत्कार करण्यात आला.
पोलीस दलात सतत एक वेगळी छाप पाडणारे चर्चेतील नाव म्हणजे PSI कैलास लहाने. अणदुर येथे पोलीस उपनिरीक्षक कैलास लहाने साहेब यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र मिळाल्याबद्दल त्यांचा अणदुर येथे घुगे परिवारच्या वतीने यशोचित सत्कार करण्यात आला. त्याचा हार फेटा, शाल, गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी सैनिक दत्तात्रय घुगे , माजी सैनिक अनिल घुगे , अक्षय घुगे , ज्ञानेश्वर घुगे , कमलाकर घुगे , प्रकाश घुगे , आण्णासाहेब घुगे उपस्थित होते. यांच्या यशाबद्दल लहाने यांचे अणदुर, नळदुर्ग तसेच उस्मानाबाद जिल्हात कौतुक होतं आहे.