काटी, दि. ०५ : तुळजापूर तालुक्यातील काटी येथे मंगळवार दि. (5) रोजी सकाळी हुतात्मा स्मृती दिनानिमित्त येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच आदेश कोळी यांच्या हस्ते हुतात्मा गणपतराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी सरपंच आदेश कोळी, पत्रकार उमाजी गायकवाड, ग्रा.पं. सदस्य सतिश देशमुख, जयाजी देशमुख, प्रशांत सुरवसे, दत्ता छबिले उपस्थित होते.