तामलवाडी : सर्जेराव गायकवाड
कोरोना संसर्गाचा कहर सोलापूर येथे दिवसेंदिवस वाढत असुन तामलवाडी ता तुळजापुर शेजारील उळे ता द.सोलापूर येथे कोरीना पाॅझीटीव्ह रूग्ण सापडल्याने तामलवाडी परीसरात एकच खळबळ उडाली असुन कोरोना आलाय दारी रहा सुरक्षित आपल्या घरी अशी कळकळीची विनंती प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
देशात,राज्यामध्ये कोरोनाची रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.या कोरोनाच्या संसर्गाने सोलापूर शहरास चांगलाच विळखा घातला असुन याठिकाणीही दररोज रूग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे.प्रशासन जीव तोडुन सांगत असुनही काही लोकांच्या चुकीमुळे या रोगाचा फैलाव होताना दिसत आहे.सोलापुर शहरासह ग्रीन झोनमध्ये असणार्या उस्मानाबाद जिल्हाच्या सिमेवरून अवघ्या १० किलोमीटर अंतरावर असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे या खेडेगावात कोरोनाचा रूग्ण सापडल्याने तामलवाडी ता. तुळजापुर गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.असे असतानाही कोरोनाला गांभीर्याने न घेता काहीजण जिल्हाबंदी असतानाही सोलापूर जिल्ह्यात छुप्या मार्गाने प्रवेश करत असल्याचे व काही लोक बाहेरगावहुन आले असल्याचे सांगुनही त्यांच्यावर कसलीच कारवाई होत नसल्याने नागरीकांमधुन नाराजी व्यक्त होताना दिसत आहे.अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर कोरोना आला असल्याने प्रशासनासह सर्वांनी याचा सामना करण्यासाठी सज्ज रहावे.हा माझा पाहुणा,माझा अमुक,तमुक असे कोणाचे काहीही न ऐकता प्रशासनाने आता कडक पावले उचलावीत असे काही सुजाण ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात येत आहे.
तामलवाडी येथील काही कंपन्यामध्ये,टो उळे ता.सोलापूर येथील काही कामगार कामास येतात त्यांच्यावरही निर्बंध घालावेत असे ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात यात आहे.एकंदरीत कोरोना तामलवाडी गावच्या अगदीच जवळ आला असल्याने प्रशासनासह ग्रामस्थांनी या कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाच्या सुचनांचे पालन करीत प्रयत्नाची पराकाष्ठा केली पाहीजे तर आणी तरच आपण कोरोनाचा फैलाव रोखु शकणार आहोत.यासाठी नागरीकांनो गांभीर्याने घ्या,आपल्या कुटुंबाची,आपल्या गावाची काळजी घ्या कारण कोरोना आलाय दारी रहा सुरक्षित आपल्या घरी अशी कळकळीची विनंती प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.