वागदरी, दि. १० :- तुळजापूर तालुक्यातील वागदरी येथे  जिल्हाधिकारी  यांच्या आदेशानुसार कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठीको सहाय्यता समितीच्या सदस्या सह ग्रामस्थांनी जिल्हा कोरोना मुक्त ठेण्याची शपथ घेतली.

  जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांनी शासनाने ज्या दिवशी लाँकडाऊन व संचार बंदी जाहीर केली त्या दिवसापासून ते आज पर्यंत जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून योग्य ती खबरदारी घेतली आहे. जनतेनेही शासन व प्रशासनला वेळोवेळी सहकार्य केल्याने उस्मानाबाद जिल्हा हा कोरोना महामारीच्या काळात आजतागायत ग्रीन झोनमध्ये आहे.  दि.१० मे रोजी सकाळी ठिक ११ वाजता उस्मानाबाद आकाशवाणी वरुन जिल्हाधिकारी जिल्ह्यातील  जनतेला कोरोना मुक्त जिल्हा कोरोना मुक्तच ठेवण्यासाठी  शपथ दिली. या उपक्रमाची आमलबजावनी करत वागदरी ग्रा.प. कार्यालयासमोर सामाजिक अंतर ठेवून कोरना सहाय्यता समीती सदस्या सह काही ग्रामस्थांनी घेतली कोरोना मुक्तीची शपथ.यावेळी कोरोना सहाय्यता कक्ष प्रमुख तथा ग्रामसेवक जी.आर.जमादार, सरपंच ज्ञानेश्वर बिराजदार, उपसरपंच दत्ता सुरवसे,ग्रा.प.सदस्य रावसाहेब वाघमारे, कमल धुमाळ, मुक्ताबाई वाघमारे, विद्या बिराजदार, आशा कार्यकर्ती भारताबाई बिराजदार, अगंणवाडी मदतनीस रुपाली जाधव,पोलीस पाटील बाबुराव बिराजदार,  रिपाइंचे जिल्हा सचिव एस.के.गायकवाड,  तानाजी लोहार उपस्थित होते.
 
Top