नळदुर्ग, दि. 10 : वडाचा तांडा ( होर्टी ) ता.तुळजापूर येथे ग्रामपंचायती च्यावतीने कुंटूबना सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
यावेळी सरपंच सौ विजया चव्हाण,उपसरपंच सौ.निमाबाई राठोड,ग्रामपंचायत सदस्य सौ ललिता चव्हाण ,सौ. चांगुणा चव्हाण , लखन चव्हाण ,सामाजिक कार्यकर्ते राजू चव्हाण,पुरोगामी संघटनेचे पृथ्वीराज चव्हाण,जयराम चव्हाण ,विकास चव्हाण, चव्हाण ,विकास राठोड,रणजित चव्हाण, आदी उपस्थित होते.
ग्राम पंचायत कार्यालय वडाचा तांडा ता. तुळजापूर च्यावतीने गावातील 192 कुटुंबाना प्रत्येकी 400 मिली सॅनिटायझर वाटप करण्यात आले.
आगामी काळात गावात जंतुनाशक फवारणी,धुरळणी बरोबरच संपूर्ण गाव सॅनिटायझेशन करण्यात येणार असल्याचे सरपंच सौ विजया चव्हाण यांनी सांगितले.