काटी :  उमाजी गायकवाड

 शरद पवार यांच्या नेतृत्वात 10 जून 1999 रोजी स्थापन झालेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 10 जून रोजी पक्षाचा  21 वा वर्धापनदिन पक्षाचा इतर कोणताही सार्वजनिक कार्यक्रम न घेता सामाजिक बांधिलकी जपत कोरोना संकटात साधेपणाने साजरा केला.         

      यंदा कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस अशोक जाधव यांच्या नेतृत्वाखाली  तुळजापूर तालुक्यातील काटी गटातील काटीसह सावरगाव, केमवाडी, जळकोटवाडी, पांगरदवाडी येथील आशा कार्यकर्तीना व कोरोना संकटात काम करणाऱ्या कोरोना वारियर्स  कर्मचाऱ्यांचा प्रत्येकाशी येणारा संपर्क आणि त्यांची गरज लक्षात घेऊन फेससीड किटचे(चेहरा संरक्षण किट) वाटप सोशल डिस्टिंक्शनचे पालन करीत माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव ढगे,सावरगावचे सरपंच रामेश्वर तोडकरी, काटीचे माजी सरपंच अशोक जाधव यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

       यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव ढगे, सावरगावचे सरपंच रामेश्वर तोडकरी, माजी सरपंच अशोक जाधव, आरोग्य अधिकारी ब्रिजेश बाचपल्ले, संदीप जगताप, नजीब काझी, अभिषेक बोराडे, सुमित लोंढे, विश्र्वास बोराडे, आरोग्य सेवक संतोष विभूते, माजी सैनिक श्रीकांत गाटे, अनिल बनसोडे, पोलीस हवालदार टी.पी. शिंदे, एस.पी. गायकवाड, मयुर संकपाळ, राहुल क्षिरसागर, साजन क्षिरसागर,पल्लवी चव्हाण यांच्यासह आशा कार्यकर्त्या, कर्मचारी, राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top