तुळजापुर : कुमार नाईकवाडी

राष्ट्रवादी काँग्रेस चे धेय धोरणे व सामाजिक बांधीलकी राखत कोरोना वायरस च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात रक्त पुरवठ्याची कमतरता भासु लागल्याने रुग्नाना रक्त पुरवठा कमी पडू नये या उद्दात हेतुने महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विषयक धोरणाला व देशाचे लोकप्रिय नेते रा.काँ. पक्षाचे अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत तुळजापुर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने रा.काँ.वर्धापन दिनाचे औचित्य साधुन दि.१० जुन बुधवार रोजी येथील सराया धर्मशाळेत रक्तदान शिबीर घेण्यात आले.

 या रक्तदान शिबीराचे उद्घाटन रा.काँ.चे प्रदेश उपाध्यक्ष जिवनराव गोरे, रा.काँ.चे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी रा.काँ.चे धैर्यशील पाटील, जि.प.सदस्य महेंद्र धुरगुडे, सुभाष अग्रवाल, गोकुळ शिंदे, नळदुर्गचे माजी नगराध्यक्ष मुस्ताफ कुरेशी, शफी शेख, धन्यकुमार पाटील, नुतन रा.काँ.चे युवक जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे, माजी उपनगराध्यक्ष गणेश कदम, अँड,अमोल पाटील, बबन गावडे, श्रीकृष्ण सुर्यवंशी, विजय सरडे, रा.काँ.युवा नेते शरद जगदाळे, गणेश नन्नवरे, अमर चोपदार, सचिन कदम, संदीप गंगणे, आप्पासाहेब पवार, शशिकांत नवले, नितीन रोचकरी,  महेश चोपदार, मनोज माडजे, रा.काँ.विद्यार्थी सेनेचे दुर्गेश सांळुके, चेतन शिंदे, आरीफ बागवान, विवेक शिंदे, रोहीत ठाकर, सुभाष पारवे, ओकांर चोपदार आदीसह कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.तसेच उस्मानाबाद सह्याद्री ब्लड बँकेचे सहकार्य लाभले.
 
Top