तुळजापुर : कुमार नाईकवाडी
सध्या संपुर्ण देशासह महाराष्ट्रात कोरोना वायरस चा पादुर्भाव असल्यामुळे आयुष मंञालय तर्फे जाहीर करण्यात आलेल्या रोग प्रतिकार वाढविण्यासाठी आर्शेनिक अल्बम ३० च्या गोळ्याचे तुळजापुर शहर युवा सेनेच्या वतीने महाराष्ट्राचे युवा सेना प्रमुख तथा पर्यावरण व पर्यटक मंञी आदित्य उद्वव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औच्युत साधुन दि.१३ शनिवार रोजी श्री तुळजा भवानी मातेच्या मंदीर परिसरात तुळजापुर शहरातील व ग्रामीन भागातील पञकारांना कोरोना च्या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद जिल्हा पञकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत कदम व युवा सेनेच्या हस्ते रोग प्रतिकार शक्तीच्या गोळ्या व फेसशिल्ड वाटप करण्यात आले.
या वेळी शिवसेनेचे शहर प्रमुख सुधीर कदम, श्याम पवार, युवा सेनेचे प्रतिक रोचकरी, सागर इंगळे, अर्जुन सांळुके, रोहीत चव्हाण, दिनेश रसाळ, बापुसाहेब नाईकवाडी, बाळासाहेब शिंदे, लखन परमेश्वर, शकंर गव्हाणे, चेतन बंडगर, सिद्राम कारभारी, विकास भोसले आदीसह युवा सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
