तुळजापूर : कुमार नाईकवाडी
विश्व पर्यावरण दिन आणि श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक संकल्पक दलित मित्र प. पू. डॉ. बापूजी साळुंखे यांची 102 वी जयंती याचे औचित्य व 6वा आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी घरूनच योगा प्रात्यक्षिक सराव तसेच छात्र सैनिकांनी घराजवळ परिसरात, वृक्षारोपण मोहीम यशस्वी पार पाडली असे एन. सी. सी.ऑफिसर मेजर डाॅ.वाय्.ए. डोके यांनी कळविले.
तुळजाभवानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. मणेर व 53 महाराष्ट्र एन. सी. सी. बटालियन चे कमांडिंग ऑफिसर कर्नल सुनील अब्राहम ,अॅडम ऑफिसर कर्नल देवेष बहुखंडी, सुभेदार संतोष भोसले यांनी छात्रांचे व उपक्रमाचे कौतुक केले.
