तुळजापूर : कुमार नाईकवाडी
उस्मानाबाद तालुक्यातील बावी येथील रहीवासी असलेले अरुण विलासराव उंडे यांचा एम.पी.एस. सी. परिक्षेत उत्तीर्ण उप जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे .
अरुण उंडे यांचे ५ वी ते १० पर्यंतचे शालेय शिक्षण तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदीर संस्थान संचलित, श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालयाचे माजी विध्यार्थी आहेत.
शासकीय सेवेत जाण्याच्या हेतूने सहा वर्षांपासून अभ्यास करीत होते . वडील विलास मनोहर उंडे माजी सैनिक आणि आई घरकाम या दोघांनी शिक्षणाच्या बबतीत कोतीही गोष्ठ कमी पडू दिली नाही आणि अरूणला उच्चशिक्षित बनवीले.
शासकीय सेवेत जाण्याच्या जिद्दीने सहा वर्ष पुण्यात स्पर्धा परीक्षांसाठी जिद्दीने अभ्यास केले. कोणत्याही प्रकारचा क्लास न लावता नौकरी करीत सातत्यपूर्ण कष्ट , जिद्द आणि चिकाटी यांच्या जोरावर त्याने यश अक्षरशः खेचून आणले . सुरुवातीला युपीएससी परीक्षेची एकदा परीक्षा दिली होते त्यात त्याला यश आले नाही.आता एमपीएससी परीक्षेतून राज्य उत्पादन शुल्क विभागात सहाय्यक आयुक्त अधिकारी म्हणून पद मिळवले . तरी अभ्यास चालुच होता दि. १९ जून रोजी परत उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाली.
वडील विलास मनोहर उंडे माजी सैनिक आणि आई यांनी शिक्षण पूर्ण केले आणि यश संपादन होत नाही तो पर्यंत त्यांच्या आई वडिलांनी प्रत्येक गोष्टीत साथ दिली त्यामुळे पूर्ण उंडे कुटूंबाचे बावी ( का ) गावामध्ये सर्व राजकीय पुढाऱ्यांनी आणि मित्र मंडळींनी बॅनर लावून अरुण उंडे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अरुण उंडे यांची उपजिल्हा अधिकारी म्हणून. पदी निवड झाल्यामुळे पंचक्रोशीत त्यांचे कौतुक केले जात आहे.
उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल बावी ( का ) ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयात सत्कार करण्यात आला .
