जळकोट,दि. २० : मेघराज किलजे

तुळजापूर तालुक्यातील होर्टी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचा इयत्ता पाचवीचा  विद्यार्थी कु. शिवतेज बालाजी माळी याची नवोदय विद्यालय साठी निवड झाली आहे. शैक्षणिक वर्ष-२०२०-२१ साठी नवोदय विदयालयाच्या इयत्ता सहावी वर्गाच्या प्रवेशासाठी पात्र झाला आहे. या यशाबद्दल शिवतेजचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.

शाळेचे मुख्याध्यापक अरुण अंगुले,बसवराज माशाळकर, व्यकंट कोळी,नितिन बैईनवाड, विजय कदम,विजयकुमार चव्हाण,बालाजी माळी,मारुती कोरे,हरिभाऊ कळबंडे यांनी शिवतेज अभिनंदन केले आहे. नितिन बैईनवाड यांचे मार्गदर्शन लाभले. शिवतेज माळी हा होर्टीच्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे  सहशिक्षक व जळकोट येथील रहिवासी बालाजी माळी यांचा मुलगा आहे. जळकोट,होर्टी येथील शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ व विविध शिक्षक संघटनेकडून अभिनंदन होत आहे.
 
Top