काटी : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील शेतकरी मोहन चंद्रहरी शिंदे यांनी गट नं. 792 मधील आपल्या साडेतीन एकरात शिवानी सीड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे तीन पिशवी सोयाबीन बियाणे शनिवार दि.13 रोजी पेरले. सध्या तालुक्यात दमदार पावसाच्या हजेरीमुळे शेतकऱ्यांनी खरीप पेरणीला वेग दिला आहे. आठ दिवसांपूर्वी नामांकित शिवानी कंपनीचे सोयाबीनचे पेरणी केलेले बियाणे न उगवल्याने येथील मोहन शिंदे हे शेतकरी काळजीत पडले आहेत. येथील कृषी सहाय्यक मनोज माळी यांनी शिंदे यांच्या शेतीला भेट देऊन पहाणी केली.
यंदा त्यांच्या कांदा व काकडी या पिकालाही लॉकडाऊनमुळे भाव मिळाला नाही, त्यातच पावसाने दमदार हजेरी लावल्याने शिंदे यांनी आपल्या साडेतीन एकर क्षेत्रावर शिवानी कंपनीचे तीन पिशवी बियाणे पेरले परंतु सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याने दुष्काळात तेरावा महिना असाच येथील गरीब शेतकरी मोहन शिंदे यांच्या बाबतीत घडला असून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी होत आहे.
