तुळजापुर : कुमार नाईकवाडी
सध्या संसर्गजन्य कोराना वायरस च्या साथीचा रोगाच्या पार्श्वभूमी वर शहरातील 50 रिक्षा चालकांना आनंद कंदले मित्र मंडळाच्या वतीने दि.१७ बुधवार रोजी फेस शिल्ड चे वाटप करण्यात आले.
या वेळी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, युवा नेते विनोद गंगणे, विजय कंदले, विशाल रोचकरी, किशोर साठे, अभिजित कदम,अशपाक शेख, रामराजु जाधव, व सर्व सहकारी मित्र परिवार आणि सर्व रिक्षा चालक बांधव उपस्थित होते.