तुळजापुर : कुमार नाईकवाडी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी कोट्यावधी जनाचे आराध्य दैवत असलेल्या श्री तुळजा भवानी मातेचे मंदीर कोरोना पादुर्भाव साथीच्या रोगा मुळे गेल्या १७ मार्च पासुन बंद आहे तब्बल तीन माहिने झाले श्री तुळजा भवानी मातेचे मंदीर श्री देवी भक्तासाठी बंद आहे. सध्या लग्न सराईचे दिवस असल्याने विवाहीत जोडपे वावर जञा घेऊन श्री तुळजा भवानी मातेच्या नगरीतील राज माता जिजाऊ महाद्वार बाहेरुनच नवदापंत्य श्री देवीचे कळस दर्शन घेऊन नथ मस्तम होऊन आपल्या सुखी संसाराची भावी जिवनाची वाटचाल श्री तुळजा भवानी मातेच्या आशीर्वादाने करीत आहेत.तसेच हजारो देवी भक्तांची कुलस्वामिनी असल्यामुळे श्री तुळजा भवानी मातेवर हजारो भक्तांची अपार श्रद्धा असल्यामुळे सर्व सामान्य भाविक रुढी पंरपरने कुलधर्म कुलाचार महाद्वार बाहेरुनच करुन जात आहेत. या मध्ये नविन माळपरडी घेऊन बाहेरुनच श्री देवी च्या नावाने यथा सांग पुजा करवून आई राजा उदो उदो चा गजर करुन कळस दर्शन घेऊन जात आहेत.सध्या कोराना संसर्गजन्य रोग असल्यामुळे तुरळक भाविकांची संख्या महाद्वार समोर दिसत आहे शहराबाहेरील चेक पोस्ट थोडा ढिला केल्याने भाविकांची संख्या वाढत असल्याचे दिसुन येत आहे या मध्ये सोलापूर ,पुणे आदीसह उस्मानाबाद जिल्ह्यातील व लातुर जिल्ह्यातील कांही भाविक दुचाकी व चारचाकी वाहने घेऊन श्री देवीचे बाहेरुन कळस दर्शन घेत असल्याचे दिसुन येत आहे मंदीर परिसरात गेल्या तीन माहिन्यापासुन सन्नाटा पसरला होता आता कुठे थोडी फार मंगळवार,शुक्रवार, रविवार, पोर्णिमा या दिवशी भाविकांची संख्या दिसु लागली आहे.