तुळजापुर : कुमार नाईकवाडी
नियमीत कर्ज भरणा-या पाञ शेतकऱ्यांना ५० हजार रुपये रक्कम तातडीने देण्यात यावी अशा प्रकारचे एक लेखी निवेदन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा च्या वतीने दि. १६ मंगळवार रोजी तुळजापुर तहसीलदार यांना देण्यात आले.
तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटंले आहे की, स.न.२०१७ ते स.न.२०१९ या कालावधीत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना जुन २०२० पर्यंत नियमीत कर्ज भरणार्या शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहनपर रक्कम देणार अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंञी अजित पवार यांनी अर्थसंल्पीय अधिवेशनात केली होती माञ ही घोषणा हवेत विरली असुन अद्याप पर्यत ही रक्कम पाञ शेतकऱ्यांना मिळालेली नाही यामुळे नियमित कर्ज भरणार्या पाञ शेतकऱ्यांना ही रक्कम तातडीने देण्यात यावी अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चा च्या वतीने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
या निवेदनावर भारतीय युवा मोर्चा चे दिनेश बागल राम चोपदार सचिन रसाळ प्रसाद पानबुडे सार्थक कदम राम अभिजित लोंढेआदीसह युवा मोर्चा कार्यकर्त्यांच्या या निवेदनावर स्वाक्षरी आहेत.