तामलवाडी  : सर्जेराव गायकवाड 

तुळजापुर तालुक्यातील तामलवाडी येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्या बालाजी अमाईन्स लि यांच्या वतीने तामलवाडी येथील आरोग्य सेविका व आशा कार्यकर्त्यांना तसेच ग्रामपंचायत कर्मचारी याना फेस शिल्डचे वाटप करण्यात आले.

        तामलवाडी येथील चव्हाण नगर परीसरामध्ये कोरोनाचा एक रूग्ण आढळल्याने प्रशासनाने हा परीसर संपुर्ण बंद करून पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या जिवाची पर्वा न करता  गावामध्ये युध्द पातळीवर काम करत असलेल्या आशा कार्यकर्त्या ,आरोग्य सेविका तसेच ग्रामपंचायत कर्मचारी  याना सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्या बालाजी अमाईन्स लि यांच्या वतीने फेस शिल्डचे वाटप करण्यात आले.तसेच कोरोनाचा रूग्ण आढळलेला परीसर निर्जंतुकीकरण करण्यासाठी बालाजी अमाईन्सच्या वतीने १२% हायपो हे रासायनिक औषध उपलब्ध करून दिले.या रासायनिक औषधाची फवारणी संबधित परीसरामध्ये करण्यात आली आहे.बालाजी अमाईन्स लि. ही आम्हाला अडचणीच्या काळात वेळोवेळी मदत व सहकार्य करत असल्याने या केलेल्या सहकार्याबद्दल  ग्रामपंचायत व समस्त ग्रामस्थांनी बालाजी अमाईन्सचे आभार मानले आहेत.

      यावेळी ग्रामविकास अधिकारी पी.एन.लाटकर,तलाठी विठ्ठल शिंदे,प्र.सरपंच दत्तात्रय वडणे,बालाजी अमाईन्सचे समन्वयक समितीचे मारूती सावंत,आरोग्य सेविका संगीता चव्हाण,आशा कार्यकर्त्या चंद्रकला रणसुरे,सविता रणसुरे,अनिता लोखंडे,सपना शिंदे,जामाबाई करंडे, आनंदा रणसुरे,शशिकांत गायकवाड,श्रीकांत गायकवाड,दस्तगीर पटेल,रहेमान जमादार,शिवाजी माळी,भारत रणसुरे आदी उपस्थित होते.
 
Top