- तुळजापुर : कुमार नाईकवाडी
श्री तुळजाभवानी मातेचे मंदीर भाविक भक्तासाठी खुले करण्यात यावे अशा प्रकारचे एक लेखी निवेदन श्री तुळजा भवानी पुजारी मंडळाच्या वतीने दि.१७ बुधवार रोजी श्री तुळजा भवानी मंदीर संस्थानचे विश्वस्त तहसीलदार यांच्या कडे देण्यात आले.
श्री तुळजा भवानी पुजारी मंडळाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटंले आहे की कोरोना संसर्गजन्य महामारी च्या काळात श्री तुळजाभवानी मातेचे मंदीर गेली तीन माहिने बंद आहे.भारत सरकार, आणि महाराष्ट्र राज्य सरकार व आरोग्य विभाग यांच्या सुचना व नियमानुसार मंदीर मध्ये कोरोना या साथीच्या रोगा बाबतीत योग्य त्या उपाययोजना करुन श्री तुळजा भवानी मातेचे मंदीर संस्थानच्या विश्वस्थानी निर्णय घेऊन उघडावे या निवेदनावर श्री तुळजा भवानी पुजारी मंडळाचे उपाध्यक्ष विपीन शिंदे यांची स्वाक्षरी आहे.