तुळजापुर : कुमार नाईकवाडी
श्री तुळजा भवानी मंदीर परिसरात असलेल्या एका मुर्ती च्या दुकानात एका तरुणाने गळफास लावुन आत्महत्या केल्याची घटना घडली.
या बाबत सविस्तर वृत असे श्री तुळजा भवानी मंदीर परिसरात कैलास बसप्पा मस्के रा.तुळजापुर यांचे श्री देवीच्या मुर्ती चे भाडोञी दुकान आहे या दुकानातील पञ्याच्या शेड मधील दुकानात कैलास बसप्पा मस्के यांचा भाच्चा ओकांर संतोष कानडे वय वर्षे १९ रा.परंडा जि.उस्मानाबाद हल्ली मुक्काम पुणे यांनी दि.१५ सोमवार रोजी मध्यराञी च्या दरम्यान आपल्या मामाच्या दुकानातील पञ्याच्या दुकानात दोरीने गळफास लावुन आत्महत्या केली. मयत ओकांर संतोष कानडे हा गेल्या चार पाच वर्षापासुन आपल्या मामा जवळच राहत होता.आत्महत्या चे नेमके कारन समजु शकले.मृतओकांर कानडे याच्या पश्छात आई वडील भाऊ बहीन असा परिवार आहे.ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस येतास तातडीने तुळजापुर पोलीस ठाण्याचे पो.नि.हर्षवधन गवळी उपपोलीस निरीक्षक जी.एस झिंजुर्डे स.पो.नि.रमाकांत शिंदे यांनी घटना स्थळी भेट देवुन या घटनेची पहाणी करुन मृत व्यक्तीचे प्रेत येथील उपजिल्हा रुग्नालयात श्वेछदनासाठी पाठविण्यात आले. घटनास्थळी बघ्याची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. कैलास मस्के यांच्या फिर्यादीवरुन तुळजापुर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली.