तामलवाडी : सर्जेराव गायकवाड

तुळजापुर तालुक्यातील तामलवाडी येथे कोरोनाने अखेर प्रवेश केला असुन चव्हाण नगर येथील एका महीलेचा कोरोना अहवाल हा पाॅझीटीव्ह आला असल्याने तामलवाडी परीसरातील गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान प्रशासनाने संपुर्ण चव्हाण नगर परीसर सिल केला असुन पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
      
  कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच चालला असुन हा विषाणू हळूहळू ग्रामीण भागातही आपले हातपाय पसरू लागल्याचे दिसुन येत आहे.या विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिस,डाॅक्टर,नर्स, सफाई कामगार प्रयत्नाची पराकाष्ठा करत आहेत.तरीही या विषाणुचा फैलाव वाढतच आहे. दि.१४ रोजी सायंकाळी तामलवाडी येथील एका महीलेचा कोरोना अहवाल हा पाॅझीटीव्ह आल्याने प्रशासन खडबडून जागे झाले असुन तामलवाडी येथील चव्हाण नगर परीसर प्रशासनाने सील केला आहे. 

तहसीलदार,गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड,आरोग्य अधिकारी श्रीमती लोंढे,सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन मीरकर,ग्रामसेवक पी.एन.लाटकर,तलाठी विठ्ठल शिंदे,प्र. सरपंच दत्तात्रय वडणे,तामलवाडी उपकेंद्राच्या श्रीमती चव्हाण ,आशा कार्यकर्त्या,यानी चव्हाण नगर परीसराची पहाणी केली व संपूर्ण परीसर सिल बंद करण्यात आला आहे. नागरीकांनी घराबाहेर न पडता आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या व कोणीही घाबरून जाऊ नका असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.कोरोना रूग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना ताब्यात घेतले असुन आणखी कोणाशी कोरोना रूग्णांचा संपर्क झाला आहे का याची चौकशी करण्यात येत असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.दरम्यान कोरोना रूग्णांच्या पतीचे पिंपळा रस्त्यावर   दुचाकी दुरूस्तीचे दुकान असल्याने दि. १० ते १४ तारखेदरम्यान ज्या व्यक्तीनी आपली दुचाकी संबधित दुकानामध्ये दुरूस्त केली आहे अशा व्यक्तींनी १४ दिवस घराबाहेर पडु नये असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.तसेच आपल्याला कोरोनाशी लढा द्यायचा आहे रूग्णांशी नाही त्याकरिता प्रशासनाचे नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास आपण नक्कीच कोरोनो वर मात करू शकतो असे वित्त व लेखा अधिकारी किरण घोटकर यानी बोलताना सांगितले आहे.तामलवाडी येथे कोरोना रूग्ण आढळुन आल्याने परीसरातील गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.परंतु नागरीकांनी घाबरून न जाता नियमांचे पालन करा व घरीच रहा सुरक्षित रहा असे आवाहनही सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन मीरकर यानी तामलवाडीसह परीसरातील जनतेला केले आहे.
 
Top