तामलवाडी : सर्जेराव गायकवाड 

तुळजापुर तालुक्यातील तामलवाडी व माळुंब्रा येथे कोरोनाचे रूग्ण आढळुन आल्याने कोरोनोच्या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दि.१६ रोजी या दोन्ही गावास भेट देऊन परीस्थितीची पहाणी केली व नागरीकांना नियमांचे पालन करण्याच्या सुचना दिल्या.

      कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव शहरी भागासह ग्रामीण भागातही  शिरकाव होताना दिसत आहे. तुळजापुर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या तामलवाडी व माळुंब्रा गावामध्ये कोरोनाचे रूग्ण आढळुन आल्याने एकच खळबळ उडाली अन् परीसरातील गावामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले.या कोरोनोच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दि.१६ रोजी तालुक्यातील माळुंब्रा व तामलवाडी येथील चव्हाण नगर परीसराला भेट देऊन पहाणी केली व परीस्थितीचा आढावा घेतला.यावेळी त्यानी कोरीनाबाधित रूग्णांचा भेदभाव न करता रूग्णांना मुळ प्रवाहात येण्यासाठी मानसिक आधार व बळ देण्याचे आवाहन करून अर्सेनिक अल्बम- ३० या रोगप्रतिकारक शक्ती वाढवणार्या गोळ्यांच्या एक हजार डबी आरोग्य विभागाकडे सुपुर्द केल्या. गावातील प्रत्येक घरामध्ये या गोळ्यांचे तसेच मास्क व सॅनिटाइजरचे वाटप करण्याच्या सुचना दिल्या.तसेच आरोग्य,पोलिस,महसुल अधिकारी यानी सतर्क रहावे व ग्रामस्थांनी प्रशासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहनही यावेळी  खा.ओमराजे निंबाळकर यांनी  केले.

        यावेळी आ. कैलास घाडगे-पाटील,आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता लोंढे, सहाय्यक पोलिस निरीक्षक नितिन मिरकर , शिवसेना तालुका प्रमुख जगन्नाथ  गवळी , शिवसेना उपतालुका प्रमुख प्रदीप मगर,गणप्रमुख अप्पुराजे गवळी, मुकुंद गायकवाड, प्र.सरपंच दत्तात्रय वडणे,आनंदा रणसुरे, ग्रामसेवक प्रदिप लाटकर, तलाठी विठ्ठल शिंदे,नागेश शिंदे,सचिन शिंदे,कृष्णा घोटकर,तुकाराम गायकवाड,आरोग्य सेविका, संगीता चव्हाण,जर्नादन गोप,जामाबाई करंडे, आशा कार्यकर्ते, सपना शिंदे, चद्रकला रणसुरे, अनिता लोंखडे, सविता रणसुरे, तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top