मुरूम : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, उस्मानाबाद जिल्ह्याच्या वतीने झूम मीटिंग ॲपच्या माध्यमातून ऑनलाइन बैठक मंगळवार (ता.सोळा) रोजी दुपारी संपन्न झाली. 

यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी काळानुरूप नवीन तंत्रज्ञान अवगत केले पाहिजे असे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष अॅड. देविदास वडगावकर यांनी व्यक्त केले. या मिटिंगचे अध्यक्ष अॅड. देविदास वडगावकर होते. प्रारंभी बैठकीचे प्रास्ताविक जिल्हा प्रधान सचिव चंद्रकांत उळेकर गुरुजी यांनी केले.  मअंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डॉ. महेश मोटे यांनी जिल्हयातील सर्व अंनिसच्या शाखांचा आढावा व चर्चा घडवून आणली.                               

    यावेळी बोलताना डॉ. महेश मोटे म्हणाले की, देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून या कोरोनाच्या काळात जिल्ह्यातील अंनिसच्या विविध शाखाच्या पुढाकाराने कार्याध्यक्ष, प्रधान सचिव व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून संकटात सापडलेल्या लोकांना वेगवेगळ्या माध्यमातून गरजूंना जीवनावश्यक वस्तूंच्या कीटचे वाटप करण्यात आल्याचे सांगून पुढेही आपण सर्वांनी मिळून असीच मदत करू या. कोरोनाविषयीची समाजामध्ये जे समज-गैरसमज आहेत त्याविषयी जनजागृती करू या, तरच कोरोनाविषयीची भीती प्रत्येकाच्या मनातून निघून जाईल. या लॉकडाऊनच्या काळात प्रत्येकाने सावधगिरी बाळगून शासनाच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन शेवटी त्यांनी केले.                                                      
  या ऑनलाईन मीटिंगसाठी कळंब, भूम, परंडा, वाशी, उमरगा, लोहारा, तुळजापूर, उस्मानाबाद तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.                    

     या बैठकीत भविष्यात आपणास काय करता येईल ? यावरही चर्चा करण्यात आली. या बैठकीमध्ये अरविंद शिंदे, किसन लोंढे, अॅड. जिनत प्रधान, प्राचार्य विरभ्रश्वर स्वामी, डॉ.राम बजगिरे, डॉ.जयश्री सोमवंशी, डॉ.सुधीर पंचगल्ले, प्रा.सचिन राजमाने, सूर्यकांत साळूंके, प्रा.गोपाळ कुलकर्णी, प्राजक्ता पाटील आदिंनी सहभाग घेऊन चर्चा केली. या बैठकीचे आभार मुरुम शाखेचे कार्यकर्ते प्रा. डॉ. सुभाष हुलपल्ले यांनी मानले.
 
Top