तामलवाडी : सर्जेराव गायकवाड
काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त हमारी आशा या कार्यक्रमाअंतर्गत सुयोग हाॅस्पिटल तामलवाडी ता तुळजापुर येथे दि.१९ रोजी आशा कार्यकर्त्या,आरोग्य सेविका,अंगणवाडी शिक्षीका,सेविका यांचा महीला जिल्हा काँग्रेसच्या वतीने काँग्रेस महीला आघाडी जिल्हाध्यक्षा डाॅ. राजलक्ष्मी गायकवाड यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कोविड- १९ चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला असुन या विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन कसोशीने प्रयत्न करत आहे.यामध्ये पोलिस,डाॅक्टर,नर्स,सफाई कामगार,आरोग्य सेविका,तसेच आशा कार्यकर्त्या या युध्द पातळीवर काम करत आहेत.या कोविड योद्ध्यांचे काम पाहुन खा.राहुल गांधी यानी त्यांचे फ्रंट लाईन कोविड योद्धे असे संबोधून कौतुक केले व हमारी आशा हा कार्यक्रम देशभर राबवला.याच हमारी आशा कार्यक्रमांतर्गत खा. राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दि.१९ रोजी महीला जिल्हा काँग्रेसच्या वतीने काँग्रेस महीला आघाडी जिल्हाध्यक्षा डाॅ राजलक्ष्मी गायकवाड यानी सुयोग हाॅस्पिटल तामलवाडी येथे गावातील आशा कार्यकर्त्या व आरोग्य सेविका यांचा फेस शिल्ड,तुळसीचे रोप,सॅनिटाइजर,मास्क,अर्सेनिक गोळ्या,आयुष काढा देऊन यथोचित सन्मान केला.कोविड- १९ या विषाणुचा आशा,आरोग्य सेविका अपुरी साधन सामग्री असताना आपल्या जिवाची पर्वा न करता जवळुन सामना करतात तसेच तसेच प्रशानची सर्व माहीती घरोघरी पोहचवुन औषधाचे महत्व पटवुन देण्याचे महत्वाचे काम आरोग्य सेविका व आशा कार्यकर्त्या करत असल्याने त्यांचा सन्मान करून त्याना बळ देऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहाण्याचे काँग्रेस पक्षाचे धोरण असल्याचे डाॅ राजलक्ष्मी गायकवाड यानी यावेळी बोलताना सांगितले.
यावेळी डाॅ.रविराज गायकवाड,डाॅ शुभांगी जळकोटे, आरोग्य सेविका संगीता चव्हाण,आशा अनिता लोखंडे,चंद्रकला रणसुरे,सविता रणसुरे,जामाबाई करंडे,सपना रणसुरे,श्रीमती मोरे,अंबुबाई तेलंग,वनिता धपाटे,करिष्मा पटेल,प्रतिक्षा म्हेत्रे,विजया रणसुरे, आदी उपस्थित होते.
