तुळजापुर : कुमार नाईकवाडी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी कोट्यावधी जनाचे आराध्य दैवत असलेल्या श्री कुलस्वामिनी आई तुळजा भवानी मातेस कंकणाकृती सुर्यग्रहणच्या पार्श्वभूमीवर दि.२१ रविवार रोजी सोवळ्यात ठेवणार असून श्री तुळजा भवानी मातेचे धार्मिक विधी खालील प्रमाणे पार पडणार आहेत.
रविवार दि. 21रोजी पहाटे पहाटे 5.ते5.15वा चरणतिर्थ, सकाळी सहा ते नऊ वाजता पुजेची घाट अभिषेक पुजा नंतर आरती व दुपारती होऊन ,श्रीतुळजाभवानी मातेस सोहळ्यात ठेवणे सकाळी 10.8ते 01.37 पर्यत नंतर दुपारी 1.37ते 03 देवीस पंचामृत स्नान वस्ञोलंकार आरती धुपारती होणार तर सांयकाळी श्री तुळजाभवानी मातेची नित्योपचार पुजा होणार आहे.
