लोहारा :
केशव गणपती रसाळ, रा. लोहारा हे त्यांच्या पत्नी- लक्ष्मीबाई रसाळ, वय 60 वर्षे असे दोघे दि. 06.08.2019 रोजी 16.00 वा. सु. माळेगांव येथे लुना मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एएम 1052 ने जात होते. प्रवासा दरम्यान केशव रसाळ यांनी मोटारसायकल रस्त्याच्या वळणावर निष्काळजीपणे चालवल्याने मोटारसायकल घसरली. या अपघातात लक्ष्मीबाई रसाळ या जखमी झाल्याने वैद्यकीय उपचारादरम्यान मयत झाल्या. या अपघात व मृत्युस केशव रसाळ हे जबाबदार असल्याचे अकस्मात मृत्युच्या चौकशीत निष्पन्न झाले. यावरुन पोहेकॉ- अनिल बोदमवाड यांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन केशव रसाळ यांच्याविरुध्द भा.दं.वि. कलम- 279, 304 (अ), सह मो.वा.का. कलम- 184 अन्वये गुन्हा दि. 13.06.2020 रोजी नोंदवला आहे.
