तुळजापूर :
मैनोद्दीन बशीर शेख रा. कुंभारी, ता. तुळजापूर हे दि. 14.01.2020 रोजी 17.30 वा. सु. नविन बसस्थानक, तुळजापूर येथे बसमध्ये चढत असतांना गर्दीचा फायदा घेउन अनोळखी व्यक्तीने त्यांच्या विजारीच्या खिशातील 20,000/- रु. चोरले होते. यावरुन पो.ठा. तुळजापूर येथे गु.र.क. 18/2020 दाखल आहे. नमूद गुन्हा तपासात तुळजापूर पोलीसांनी आरोपीच्या ताब्यातून नमूद चोरीची रक्कम जप्त केली होती. ती रक्कम न्यायालयाच्या आदेशाने मैनोद्दीन बशीर शेख यांना दि. 12.06.2020 रोजी पो.नि. श्री हर्षवर्धन गवळी यांच्या हस्ते तुळजापूर पो.ठा. येथे हस्तांतरीत करण्यात आली. रक्कम परत मिळाल्यामुळे मैनोद्दीन शेख यांनी या प्रसंगी तुळजापूर पोलीसांचे आभार व्यक्त केले.
