बारामती, दि. 13 : राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहीत पवार यांच्याकडे विविध विकास कामाच्या संदर्भात राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या उत्तर समन्वक कु. दिव्या पाटील यांनी भेट घेवून जळगाव जिल्हातील सुतारबर्डी धरणाचा पाठपुरावा करण्याबाबत प्रथमतः चर्चा केली. हा भाग ओलिताखाली आला तर या भागातील शेती भाग सुजलाम सुफलाम होईल.

गावातील महिला बचत गटांना सक्षमीकरण करण्यासाठी उदयोजक सुनंदा ताई पवार यांच्या संस्थेच्या माध्यमातून अर्थसहाय्य करणे तसेच गावातील युवक उच्चशिक्षण घेतलेली आयटी डिप्लोमा, इंजिनिअरिंग, कृषीविषयक डिप्लोमा, यात शिक्षणात प्राविण्य घेतलेले मुले यांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्नशिल राहावे, जळगाव जिल्हात कोविड 19 टेस्टींग लॅब साठी राज्याचे आरोग्यमंञी राजेश टोपे यांच्याशी चर्चा करून लवकर लॅब ची उभारणी करावी व काही अवधीवर शैक्षणिक वर्ष सुरू होत असून डाॅक्टर अॅट स्कूल च्या माध्यमातून शाळेतील लहान मुलांची आरोग्य तपासणी म्हणून भरारी पथकाची उभारणी करावी, अशी मागणी आ.पवार यांच्या भेटी दरम्यान कु. दिव्या पाटील यांनी केली. 

सकारात्मकपणे सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन आ. रोहित पवार यांनी दिल्याची माहीती राष्ट्रवादी युवती काँग्रेस उत्तर समन्वयक कु.दिव्या पाटील यांनी दिली.
 
Top