मुरूम, दि. 13 : उमरगा तालुक्यातील मुरुम येथील श्री बाळकृष्ण माऊली मंदिर ट्रस्टच्या वतीने किसान चौक ते हिंदू स्मशानभूमी रोडच्या मागणीचे निवेदन शुक्रवार (दि. १२) रोजी नगरपरिषदेच्या सभागृहात नगराध्यक्षा अनिता अंबर व उपनगराध्यक्ष श्रीकांत बेंडकाळे यांच्याकडे देण्यात आले. 

सदर स्मशानभूमी ही किसान चौकातून जाणाऱ्या आष्टाकासारकडे जाणाऱ्या रस्त्यालगत आहे. या हिंदू स्मशानभूमीकडे जाण्यासाठीचा हा कच्चा रस्ता असून त्यावर अनेक खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात तर एखाद्या व्यक्तीचे अंत्यसंस्कार करण्यासाठी जाणे अडचणीचे होते. या रस्त्यावरून सहजासहजी नागरिकांना ये जा करता येत नाही. या रोडवर लाईटची सुविधा नसल्याने ती बसविण्यात यावी, हा रस्ता सिमेंट काँक्रीटचा लवकरात लवकर करण्यात यावा असे या निवेदनात म्हटले आहे. 

या निवेदनावर माऊली मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अरविंद बेंडकाळे, सचिव अर्जुन भालकाटे, उपाध्यक्ष उमेश वेदपाठक, कोषाध्यक्ष प्रभाकर वेदपाठक, सदस्य गोकुळ शिंदे, वैजीनाथ बदोले, व्यापारी संघाचे अध्यक्ष अशोक मिणीयर, डॉ. राधाकृष्ण डागा, शंकर टेकाळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

यावेळी या पदाधिकाऱ्यांना नगराध्यक्षा अनिता अंबर यांनी येत्या चार महिन्याच्या आत हा रोड पूर्ण करून देण्याचे आश्वासन देण्यात आले. या समस्येबाबत दिलेल्या ट्रस्टच्या निवेदनामुळे हा रस्ता मार्गी लागेल आणि या स्मशानभूमीकडे जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय दूर होईल. या सेवाभावी वृत्तीने काम  करणाऱ्या या ट्रस्टने नुकतेच या स्मशानभूमी परिसरात वाढलेल्या काटेरी झाडे-झुडूपे जेसीपीच्या सहाय्याने काढण्यात आले आणि आता या रस्त्याचे निवेदन नगर परिषदेला दिल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.  
 
Top