तुळजापूर :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशान्वये तथा मनसेनेते अभिजित पानसे,आमदार राजूदादा पाटिल,सरचिटणीस दिलीप बापू धोत्रे,राज्य उपाध्यक्ष जावेदभाई शेख धाराशिव जिल्हा संघटक अमरराजे कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि.१३ जून २०२० रोजी राजगड जिल्हा कार्यालय तुळजापूर येथे *महेश जाधव (बावी) व अभिजित पाटिल (करजखेडा)* यांची *तालुका उपाध्यक्ष* पदी निवड करण्यात आली.

नियुक्तीपत्रात मनसे पक्षाचे ध्येय धोरणे,सामाजिक उपक्रम राबवून पक्ष वाढीसाठी सर्वांनी मिळून कार्य करणे अपेक्षित असल्याचे नमूद केलेले आहे.यावेळी जिल्हा संघटक अमरराजे कदम,तुळजापूर शहराध्यक्ष धर्मराज सावंत,तालुका उपाध्यक्ष अक्षय साळवे,विशाल माने,सौरभ लोखंडे,महेश तांबे,बालाजी तांबे,श्रीकांत महाडीक उपस्थित होते.
 
Top