आपला सर्वांचा खुप खुप आभारी आहे.आपण एवढ्या व्यस्त काळात सुध्दा मला तुम्ही सर्वांनी वेळात वेळ काढून दोन दिवस शुभेच्छांचा वर्षाव केला. खरंच तुमच्या या शुभेच्छारूपी आशिर्वादाने अक्षरशः भारावून गेलो आहे.

    दैनिक पुण्यनगरीच्या माध्यमातून काटी प्रतिनिधी म्हणून पत्रकारितेत सक्रिय होऊन बघता-बघता 12 वर्षे उलटली.या कालावधीत अनेक पत्रकारांसह काटीसह परिसरातील, तालुक्यातील, लहानथोरांपासून आपणा सर्वांशी  वेगवेगळ्या निमित्ताने संपर्क आला. काहीजणांच्या सानिध्यात बर्‍याच नवनवीन बाबी अवगत झाल्या.अनेक मित्र आयुष्यभरासाठी जोडले गेले.काटी प्रतिनिधी म्हणून 
पत्रकारिता करताना कधी कौतुकाची बरसात तर कधी तटस्थ लेखनामुळे काहीजणांच्या हितसंबंधाला आलेली बाधा; त्यातून मिळालेल्या धमक्या, कधी स्त्रोतांनीच दबावापोटी कधीकधी तत्वाशी दगलबाजी करुन हात वर केल्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती यामुळे अनेकदा मनःस्तापही सोसावा लागला. पण सत्य मांडून एखाद्याला न्याय मिळवून देताना काहीजण दुखावणार याची जाणीव होतीच. अशा काळातही आपल्या सदिच्छाच परिस्थितीला निर्भिडपणे सामोरे जाण्याचे बळ आणि प्रेरणा देत गेल्या.या प्रवासात मला मार्गदर्शन करणारे गुरूजन, वेळोवेळी सहकार्य करणारे सजग सहकारी आणि आपणा सर्वांचे पाठबळ यापुढेही सदैव सोबत राहिल. तशीच माझी पत्रकारिताही प्रखर होत राहील.

        दिवसभरात मला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष, फोनद्वारे, सोशल मीडियाद्वारे दिलेल्या प्रेमपूर्वक, निर्मळ सदिच्छा माझ्या वाटचालीत सतत ऊर्जा देत राहतील.बऱ्याच जणांनी मनोमन दिलेल्या शुभेच्छ्यांचाही मी स्वीकार करतो. त्याचबरोबर इच्छा असूनही वेळेअभावी शुभेच्छा देऊ न शकलेल्या माझ्या सर्व स्नेहीजणांचाही मी आभारी आहे. 

         आपण दिलेल्या या शुभेच्छ्यांच्या जोरावर मी माझ्या पुढील आयुष्यात गरुडझेप घेईल यात शंका नाही. यापुढील काळात आपले प्रेम आणि साथ अशीच कायम राहावी ही माफक अपेक्षा👏👏
आपणा सर्वांचे मनस्वी आभार..✍️

               आपला
               पत्रकार
        उमाजी गायकवाड
         काटी ता.तुळजापूर
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
 
Top