खानापूर : बालाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटगाव येथील एका व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आल्याने काटगाव मध्ये खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे.त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 22 जणांना तपासणीसाठी तुळजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
काटगाव येथील एक पुरुष व्यक्ती ताप आल्याने उपचारासाठी सोलापूर येथील एका रुग्णालयात दाखल झाला होता. तो व्यक्ती तेथील कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या रुग्णांच्या संपर्कात आल्याने त्याला कोरोनाची लागण झाल्याचे समजत आहे. कोरोना पेंशेट वास्तव्यास असलेली गल्ली प्रशासनाकडून सील करण्यात आली आहे.त्या गल्लीला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. कोरोना पॉझिटीव्ह पेशेंन्टच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीं व त्यांचे नातेवाईक असे एकूण 22 जणांना अहवाल तपासणीसाठी तुळजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. खबरदारी म्हणून गावकऱ्यांच्या वतीने गावामध्ये पाच दिवस जनता कर्फ्यु लागू करण्यात आला आहे.
तहसीलदार सौदागर तांदळे,.गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड,तालुका वैद्यकीय अधिकरी डॉ.सुहास पवार,काटगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.रविंद्र पुंडे,ग्रामविकास अधिकारी भीमराव झाडे यांनी प्रतिबंधित क्षेत्राला भेट देऊन पाहणी केली. आवश्यक त्या उपाययोजना राबवण्याच्या सूचना दिल्या.नागरिकांनी घराबाहेर पडू नये काळजी घ्यावी व घाबरून जाऊ नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.