काटी : उमाजी गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील काटी येथील त्या संशयित रुग्णाचा रिपोर्ट गुरुवार रोजीज पहिल्या चाचणीत निगेटिव्ह आला असून त्या पेशंटला तुळजापूर येथे 14 दिवस कोरंटाईनमध्ये ठेवणार असून पाचव्या दिवशी आणखी स्वॅब घेऊन चाचणी करण्यात येणार आहे. 14 दिवसांचा कोरंटाईन कालावधी संपल्यानंतर  पेशंटला घरी सोडणार आहे. पहिला रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने  नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

     परंतु ग्रामपंचायतने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून तीन दिवसाचा पुकारलेला जनता कर्फ्यू चालू राहणार आहे.
 
Top