काटी : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथे गुरुवार दि. 18 जून रोजी सायंकाळी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. अस्मिता कांबळे यांनी भेट घेऊन संशयित कोरोना रुग्णाची चौकशी केली.
यावेळी बोलताना सौ. कांबळे म्हणाल्या की, संशयित रुग्णाचा रिपोर्ट काहीही येऊ द्या त्यास घाबरून न जाता स्वत:ची काळजी स्वत:च घेऊन कोरोना विषाणूचा एकत्रितपणे लढा देऊन विनाकारण बाहेर न पडण्याचे आवाहन करीत ग्रामपंचायत, प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील, सरपंच आदेश कोळी, चेअरमन विक्रमसिंह देशमुख, मकरंद देशमुख, तलाठी प्रशांत गुळवे, ग्रामसेवक लक्ष्मीकांत सुरवसे, प्रदीप साळुंके, बाळासाहेब भाले, हेरार काझी, सतिश देशमुख, सुहास साळुंके आदी मान्यवर उपस्थित होते.
