मुरुम, दि.१९ : प्रतिभा निकेतन विद्यालय, मुरूमच्या वतीने शाळा बंद शिक्षण सुरू या उपक्रमांतर्गत इयत्ता दहावीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अभ्यासक्रमाचे मूल्यमापनांतर्गत सुंदरवाडी व कंटेकूर या गावी जावून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइनद्वारे पूर्ण केलेल्या अभ्यासाक्रमाची तपासणी सहशिक्षक उल्हास घुरघुरे, तात्यासाहेब शिंदे, राधाकृष्ण कोंढारे, विवेकानंद परसाळगे, इरफान मुजावर, चंद्रामप्पा कंटे, पर्यवेक्षीका महानंदा रोडगे, सहशिक्षिका मंगल शिंदे, मनीषा कंटेकूरे, शाईन तांबोळी आदींनी सुंदरवाडी व कंटेकूर या गावातील विद्यार्थ्यांच्या घरोघरी भेटी देवून अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांच्या नोटस् तपासणी करून त्यांना सुचना देवून मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक काशिनाथ मिरगाळे, उपमुख्याध्यापक धनराज पवार, पर्यवेक्षक प्रवीण गायकवाड हे शिक्षकांना मार्गदर्शन करीत आहेत. यावेळी पालकांनी या शैक्षणिक उपक्रमाचे कौतुक करून शिक्षकाप्रती आदर व्यक्त केला.

