मुरुम : अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीयनेते खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्याकडून देण्यात आलेले अन्न पॅकेट मुरूम शहर काँग्रेसकडून विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे व्हाईस चेअरमन प्रमोद कुलकर्णी यांच्या हस्ते  नगराध्यक्षा अनिताताई अंबर, उपनगराध्यक्ष श्रीकांत बेंडकाळे यांच्याकडे शुक्रवार (ता.१९) रोजी सुपूर्द करुन गरीब, निराधार व हातावर पोट असणाऱ्या मजुरांना वाटप करण्यात आले.

 या पॅकेटचे शहरात प्रभागनिहाय फिजिकल डिस्टन्सिंग ठेवून नगरसेवक व कार्यकर्त्यांमार्फत गरीब व गरजूंना देण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष सुधीर अंबर, रशिद शेख, नगरसेवक सहदेव गायकवाड, शभुलिंग पाटील, आयुब मासुलदार, सिध्दु स्वामी, इब्राहिम नदाफ, सुरेश शेळके, मंगल नारायणकर, विजयश्री भालेराव, सुलभा अंबुसे, ज्योती बन्ने, सुनंदा कुंभार, महानंदा गुंडगुळे, सुमन देडे, फरजाना कोतवाल आदींची उपस्थिती होती. जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बापूराव पाटील यांच्या कल्पनेतून अन्न पॅकेट बनविण्यात आले.

 सध्या जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा काही केला तरी थांबायला तयार नाही. कोरोना विषाणूचा संक्रमण होऊ नये म्हणून सध्या संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीमुळे हातावर पोट असणाऱ्या मजुरांचे हाल होत आहेत. या परिस्थितीत गरिबांना किमान एक वेळचे जेवण मिळावे या भावनेतून वाढदिवसाचे औचित्य साधून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जाफर मोमीन, महावीर नारायणकर, उल्हास घुरघुरे, गोपीचंद राठोड, तुकाराम राठोड, श्रावण गायकवाड, प्रशांत सुरवसे, पवन कांबळे आदिंनी पुढाकार घेतला.

 यावेळी नगरपरिषदेच्या वतीने सुधीर अंबर यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बापूराव पाटील, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरणजी पाटील यांचे विशेष आभार मानले.                        



                                        
 
Top