तामलवाडी : सर्जेराव गायकवाड
दरवर्षी मृग नक्षत्र हा जवळपास कोरडाच जातो परंतु दि.१० रोजी रात्री मृग नक्षत्राच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले असुन तामलवाडी व परीसरामध्ये महाबीज बियाणे मिळत नसल्याने शेतकरी निराश झाल्याचे दिसुन येत आहे.
कोरोना या संसर्गाच्या सावटाखाली जीवन जगत असताना दि.१० रोजी संध्याकाळी तामलवाडी व परीसरामध्ये मृग नक्षत्राच्या पाऊसाच्या जोरदार सरी बरसल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरलेले दिसुन येत आहे.गेली तीन महिन्यापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन सुरू असुन सर्वजण घरामध्येच बसुन होते.हा उन्हाळा जाऊन कधी एकदा मृग नक्षत्राचा पाऊस पडतोय असे झाले होते. लाॅकडाऊनमुळे प्रदुषण कमी झाल्याने यावेळी भरपूर पाऊस पडणार असे अंदाज लावले जात असतानाच दि.१० रोजी संध्याकाळी मृग नक्षत्राचा पहीला पाऊस जोरदार बरसला अन् शेतकरी राजाचा आनंद द्विगुणीत झाला.समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी पेरणीच्या तयारीला लागला,प्रशासनानेही शेतकर्यांना बांधावर बियाणे देण्यास सांगितले परंतु शेतकरी पेरणीच्या तयारीत असताना माशी शिंकली तामलवाडी येथे महाबीज बियाणे नसल्याचे कृषी दुकानचालकाकडुन सांगण्यात आल्याने शेतकरी निराश झाल्याचे दिसुन येत आहे.तामलवाडी येथील साईराम कृषी सेवा केद्र येथे महाबीज बियाणे असतानाही दिले नसल्याचे निदर्शनास आले त्यास विचारले असता अगोदर काही शेतकर्याकडुन पैसे घेतले होते त्याना दिले आहे आता बियाणे नसल्याचे सांगण्यात येत आहे.परंतु गोडाऊनमध्ये बियाणे असतानाही तो देत नसल्याचे काही शेतकर्यांनी बोलताना सांगितले.
याविषयी कृषी अधिकारी गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता मी चौकशी करून सांगतो असे उत्तर मिळाले. एकीकडे मा. मुख्यमंत्री साहेब कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खते ,बियाणे बांधावर देण्याचे आदेश देतात परंतु दुसरीकडे काही कृषी सेवा केद्र चालक हे महाबीज बियाणे असतानाही माल कमी आहे म्हणून सांगत इतराना मात्र पुरेपूर माल देतात याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी शेतकरी राजाकडुन केली जात आहे.एकंदरीत मृग नक्षत्राच्या पडलेल्या पावसाने झालेला आनंद हा बियाण्याच्या तुडवड्याने हिरावुन नेल्याची खंत शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे.

