मुरूम : जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरणजी पाटील यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे गुरुवारी ( ता. अकरा ) रोजी एका निवेदनाद्वारे खालील मागण्यांचे पत्र देण्यात आले.
कोरोनाचा फैलाव सध्या दिवसेंदिवस वाढत असून आहे. त्याला रोखण्याचे मोठे आव्हान आपल्या सर्वांसमोर आहे. या कोरोनाच्या संकटामध्ये सध्या शेतकरी आर्थिकदृष्टया अडचणीत असल्याने शेतकऱ्यांना खरीप पेरणीकरिता शेतकऱ्यांना खते-बियाणे योग्य दरात उपलब्ध करून देणे, बाहेरगावाहून परजिल्ह्यातून आलेल्या लोकांना जिल्ह्यातील सहाशे शाळांमध्ये कॉरंनटाईन करण्यात आले आहे त्या शाळांना ताबडतोबीने निर्जंतुकीकरण करण्यात यावे, जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रात आसेंनिक अल्बम गोळ्या उपलब्ध करून द्याव्यात, रोजगार हमीची कामे वाढवून देऊन मजूरांच्या हाताला काम द्यावे, मुख्याध्यापकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून शाळा सुरू करण्याबाबत चर्चा घडवून आणावी आणि त्यावर योग्यत्या उपाययोजना कराव्यात असे या निवेदनामध्ये शरणजी पाटील यांनी म्हटले आहे. तसेच जिल्हा परिषद गटनिहाय आढावा बैठका घेऊन तेथील नागरिकांच्या समस्यांबाबत चर्चा घडवून आणावी आणि त्यावर योग्यत्या उपाययोजना कराव्यात.
